घर व्हिडिओ देवळाली प्रवरा नगरपालिकेचा स्वच्छ शहर म्हणून दिल्लीत गौरव

देवळाली प्रवरा नगरपालिकेचा स्वच्छ शहर म्हणून दिल्लीत गौरव

72
0
https://youtu.be/GLaVRT1rchA
देवळाली प्रवरा (प्रतिनिधी):
 स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ मध्ये महाराष्ट्रातील “क” वर्ग नगरपालिकांमधून देवळाली प्रवरा नगरपालिकेने स्वच्छ शहर पुरस्कार प्राप्त केला असून बुधवार, दि. ०६ रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या पदाधिका-यांनी  पुरस्कार स्वीकारून देवळाली प्रवरा नगरपालिकेचा स्वच्छ शहर व उत्कृष्ट शहर, उत्कृष्ट प्रकल्प म्हणून दिल्लीत गौरव करण्यात आला आहे.
भारतात स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ चालू असून त्यामध्ये देवळाली प्रवरा नगरपालिकेने सहभाग नोंदवला होता. देवळाली प्रवरा नगरपालिकेने स्वच्छ भारत सर्व्हेक्षणामध्ये नगरपालिकेच्या कामगारांपासून ते नागरीकांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविल्याने स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ मधील “क” वर्ग नगरपालिकामधील स्वच्छ शहर म्हणून देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवड झाली आहे. बुधवारी दिल्ली येथे सकाळी ११:३०  वाजता राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात १० महापालिका व नगरपालिकांना स्वच्छ शहर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तर देवळाली प्रवरा नगरपालिकेला नाविन्यपूर्ण उत्कृष्ट शहर व उत्कृष्ट प्रकल्प, स्वच्छ शहर आदी पुरस्कार स्वच्छ भारत मिशनचे जॉंइंट सेक्रेटरी विनोद कुमार जिंदाल, गृहनिर्माण शहर विकास मंत्रालय सचिव दुर्गाशंकर मिश्रा आदींच्या हस्ते देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम पा, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, गटनेते सचिन ढूस, बांधकाम अभियंता सुरेश मोटे यांनी स्वच्छ शहर निवडीचा पुरस्कार स्वीकारला. देवळाली प्रवरा नगरपालिकेचा स्वच्छ शहर म्हणून दिल्लीत गौरव करण्यात आल्याबद्दल देवळाली प्रवरा शहरात आनंद व्यक्त करण्यात आला.
 देवळाली प्रवरा नगरपालीकेची स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ मध्ये स्वच्छ शहर म्हणून निवड करण्यात आल्याबद्दल नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, देवळाली नगरपालिकेला स्वच्छता शहर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र दिल्ली येथे स्वीकारले आहे. स्वच्छ शहर निवड होण्यात नागरिक, अधिकारी, कामगार यांचा मोठा वाटा आहे. कोणतेही काम करताना सर्वांना बरोबर घेऊन केले तर त्याचे फळ निश्चितच मिळते असे कदम यांनी सांगितले.
                   स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ मध्ये देवळाली प्रवरा नगरपालिकेची स्वच्छ शहर निवड व देवळाली प्रवरा
नगरपालिकेचा दिल्लीत गौरव झाल्याबद्दल नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
16 − 3 =