घर राष्ट्रीय भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पुढे ढकलली

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पुढे ढकलली

अहमदाबाद येथे गुरुवारी ही बैठक होणारी होती.

45
0

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्षाच्या कार्यकारिणी समितीची बैठक ही पुढे ढकलली आहे. ही बैठक उद्या (गुरुवार) अहमदाबाद येथे होणार होती. भारतीय वायूसेनेच्या विमानांनी मंगळवारी पीओकेतील बालाकोट येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ले केले होते. या हल्ल्यात अनेक दहशतवादी तळ नष्ट झाले तसेच २०० ते ३०० च्या आसपास दहशतवादीही मारले गेले होते. त्यानंतर दोन्ही देशात कमालीचा तणाव निर्माण झाला असून पाकिस्तानी लष्कराच्या विमानांनी बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. भारताने त्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांचे एफ १६ विमान पाडले. त्यामुळे सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
2 × 6 =