घर जिज्ञासा मधुर संबंधासाठी एकमेकांसाठी वेळ काढून संवाद राखायला हवा

मधुर संबंधासाठी एकमेकांसाठी वेळ काढून संवाद राखायला हवा

69
0

प्रत्येक जण आनंदात राहण्यासाठी जीवनात आपल्या कुटुंबाकडून काही किमान अपेक्षा बाळगत असतो. या अपेक्षा बहुधा खूप क्षुक असतात; पण माणूस त्या बोलून न दाखवता त्याबाबत मनातल्या मनात कुढत राहातो. यामुळे नात्यातही आतल्या आत कटुता निर्माण होतो.
पती-पत्नी नात्यात अशा वेळी त्याला वाटते की, आपला जोडीदार आपल्याला दुर्लक्षित करीत आहे. खरे तर अशावेळी मोकळ्या मनाने बोलायला हवे. आपल्याला काय हवे ते सांगायला हवे. परस्परांशी बोलून आपली स्वप्ने साकार करायला हवीत. संबंध जेवढे जवळचे असतील तेवढा जास्त मोकळेपणा त्यात असायला हवा. दैनंदिन दगदग व तणावावरील हा उत्तम उपाय आहे. पती-पत्नी उभयतांनी परस्परांची पूर्ण काळजी घ्यायला हवी. एकमेकांचे दोष दाखवण्याऐवजी एकमेकांना मजबूत करण्याचा प्रयत्न करायला हवा. कितीही प्रेमाचे संबंध असले तरी, एकाच्या मनात दुसर्‍याविषयी काय आहे हे जाणणे सोपे नसते. अशावेळी मन मोकळे करण्याऐवजी स्वत।च एक मत बनवून घेते. संबंधातील गुंतागुंत टाळण्यासाठी आपल्याला आपल्या भावना व्ययत करण्याची कलाही यायला हवी. आपल्या पार्टनरशी स्पष्ट शब्दांत बोलाल तर नक्कीच समस्या सोडवण्यास सोपे जाईल व आनंदी जीवनाकडे एक पाऊल टाकले जाईल. काही स्त्री-पुरुष आपल्या समस्या एकमेकांत शेअर करायला घाबरतात. याची अनेक मानसशास्त्रीय कारणे असू शकतात. उदा. जोडीदारावर भार न टाकणे, त्याच्याकडून सहकार्याची अपेक्षा नसणे वा इगो प्रॉब्लेम. परंतु संबंध मधुर बनवण्यासाठी या भ्रमातून बाहेर पडायलाच हवे. एकमेकांसाठी वेळेचा अभाव हेही एक मोठे कारण असू शकते. बहुधा इतर गोष्टीत गुरफटून राहिल्यामुळे एकमेकांसाठी वेळ उरत नाही. यामुळे संबंध कमी होणे स्वाभाविक असते. मधुर संबंधासाठी एकमेकांसाठी वेळ काढून संवाद राखायला हवा. बोलताना आपलेच घोडे पुढे न दामटता आपल्या जोडीदाराला काय हवे आहे हे पाहायला हवे.
बहुधा पार्टनर बोलत असताना आपण आपल्या विचारात, कामात, बोलण्यात गुंग असतो त्यामुळे संवाद साधला जात नाही. पार्टनरचे मन जाणता येत नाही. यासाठी वेळ मिळेल तेव्हा आपल्या पार्टनरच्या भावना जाणण्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा व त्याला भावनिक आधार द्यायला हवा.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
30 ⁄ 15 =