घर व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी

85
0

राहुरी फॅक्टरी-  येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
  डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे पुजन कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव निमसे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी कार्यकारी संचालक टी. आर.ढोणे, प्रशासकीय अधिकारी बी.एन.सरोदे, संचालक मंडळ , अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 देवळाली प्रवरा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड, राजेंद्र लोंढे, वैभव गिरमे, किशोर कोबरणे, रफीक शेख़,रावसाहेब मुसमाडे, कुणाल पाटिल, शुभम पाटिल, योगेश सिनारे, ऋषी राऊत,सुमेध सोजवळ, किशोर साळुंके उपस्थित होते. सुरेंद्र थोरात मित्र मंडळ व मराठा ग्रुपच्यावतीने रॅली काढून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.विवेकानंद नर्सिंग होम व फार्मसी कॉलेज विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी फेटे व पारंपारिक वेशभूषा करून मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
6 × 26 =